यश, गौरव आणि परंपरेची ३२ वर्षे
या प्रशिक्षण केंद्रामधुन सन 1994 ते सन 2026 पर्यंत एकुण 28 सत्रांमध्ये एकुण 17846 महिला व पुरुष प्रशिक्षणार्थी उत्तमरित्या मुलभूत प्रशिक्षण घेवून बाहेर पडले आहेत.
२८+
यशस्वी प्रशिक्षण सत्रे पूर्ण
१७,८४६+
प्रशिक्षणार्थी यशस्वीरीत्या प्रशिक्षित
१५१२
सद्यस्थितीतील प्रशिक्षणार्थींची संख्या
१७००+
प्रशिक्षण क्षमता (प्रमाण वाढवलेली)
आमच्या विषयी
स्थापना. सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्राची, स्थापना दिनांक 12/05/1994 रोजी झालेली आहे. या प्रशिक्षण केंद्राचे कार्यालय सोलापूर शहरातील गुरुनानक चौक, येथे सुरु करण्यात आले होते. नंतर केगांव येथील 328 एकरमध्ये प्रशिक्षण केंद्र सुरु झाले. सद्यस्थितीला सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्राची प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देण्याची क्षमता महाराष्ट्र शासन, गृह विभाग, शासन निर्णय क्र. पोलीस-1423/प्र.क्र.244/पोल-5अ दि. 11/12/2023 अन्वये 1200 वरुन 1700 प्रशिक्षणार्थी करण्यात आली आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी, पोलीस उप निरीक्षक (डिपार्टमेंटल) तसेच होमगार्ड यांना प्रशिक्षण दिले जाते.

प्राचार्य
श्री विजयकुमार चव्हाण
हे क्षेत्र आम्ही गाठलेलं शिखर आहे!
हे प्रशिक्षण केंद्र शारीरिक, मानसिक आणि नैतिकदृष्ट्या सशक्त व्यक्तिमत्व घडवण्यावर लक्ष केंद्रीत करेल. प्रशिक्षणार्थींमध्ये शिस्त, जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण केली जाईल. समाजसेवा ही केवळ जबाबदारी नाही तर ती एक मानाची गोष्ट आहे, हे येथे शिकवले जाईल. नवीन तंत्रज्ञान आणि आव्हानांबाबत जागरूकता तयार करण्यात येईल. हे केंद्र बदलत्या काळाला सामोरे जाणारे सजग नेतृत्व घडवेल.

आम्हाला का निवडावे?

कमांडो प्रशिक्षण
प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना कठीण, व्यावहारिक व शारीरिक क्षमतेची मर्यादा ओलांडणारे खडतर प्रशिक्षण दिले जाते.

संपूर्ण व्यक्तिमत्व विकास
केवळ शारीरिक प्रशिक्षण नव्हे, तर नैतिकता, मानसिकता आणि नेतृत्व यावरही भर.

आधुनिक प्रशिक्षण सुविधा
आम्ही प्रशिक्षणार्थ्यांना अत्याधुनिक शस्त्रास्त्र, रणनैतिक तयारी आणि मैदानात प्रत्यक्ष कृतीवर आधारित प्रशिक्षण देतो.
सामान्य प्रश्न (FAQ)
प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने निश्चित केलेल्या निकषांचे पालन करावे लागते. अधिक माहिती साठी आमच्या संपर्क विभागाशी संपर्क साधा किंवा अधिकृत अधिसूचना तपासा.
मुलभूत प्रशिक्षण सत्र सामान्यतः ६ ते १२ महिने असते, जे अभ्यासक्रमानुसार बदलू शकते.
नाही, महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार प्रशिक्षण हे मोफत आहे. परंतु, काही विशेष अभ्यासक्रमांसाठी अतिरिक्त खर्च असू शकतो.
होय, प्रशिक्षणार्थींसाठी निवास सुविधा उपलब्ध आहे. याबाबत अधिक माहिती सत्र सुरू होण्यापूर्वी दिली जाते.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र पोलिस दलात नियुक्तीची संधी मिळते, जी शासनाच्या नियमानुसार ठरते.